ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 16 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, १८ प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी, कुंभस्नासाठी प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी उसळली गर्दी, मृतांमध्ये तीन बालकांसह दहा महिलांचा समावेश

दिल्ली स्टेशनवरील भाविकांची चेंगराचेंगरी आयत्यावेळी प्लॅटफॉर्म बदलण्याच्या उद्घोषणेमुळे.. प्रत्यक्षदर्शींच्या मते तब्बल  पाऊणतासानंतर पोहोचली मदत

नवी दिल्ली स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी चार अतिरिक्त ट्रेन पाठवण्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घोषणा.. गर्दी ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचा रेल्वेचा दावा

दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी मुंडे-धस भेटीत बावनकुळेंची मध्यस्थी, सूत्रांची माहिती...तर भेटीची बातमी फोडली, यात कुणाचं तरी षडयंत्र, सुरेश धस यांचा आरोप...

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी, एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र लढवण्यावर ठाम असल्याची माहिती

सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती, रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य...हे मोदींचंचं अपयश, विनायक राऊतांचा टोला...तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-new-delhi-railway-station-stampede-1344522

Post a Comment

0 Comments