Maharashtra Kesari 2025 Pruthviraj Mohol: अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) कुस्ती स्पर्धा काल (2 फेब्रुवारी) पार पडली. या कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे. पृथ्वीराज मोहोळ सोलापूर येथील महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याच्याशी महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळला दोन गुण मिळाले, तर महेंद्रला एक गुण मिळाला.

16 सेकंद राहिलेले असताना महेंद्रने मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी घोषित केलं. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी झालेल्या पृथ्वीराज मोहोळ याला मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली आहे. पैलवान घरातील आपण चौथ्या पिढीचे पैलवान असून वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळने दिली. तसेच वडिलांना खांद्यावर घेऊन पृथ्वीराज मोहोळने मैदानात जल्लोष केला आहे.

पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केल्यानंतर एकच जल्लोष-

पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांची कुस्ती सुरू असताना गायकवाड यांनी आखाडा सोडला. दोघांचे एक-एक गुण झाल्यानंतर अचानक महेंद्र गायकवाड याने अचानक कुस्ती मैदान सोडल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र काही सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केल्यानंतर मोहोळ याच्या समर्थकांनी जल्लोष केला.

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्ती रंगली असताना असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. खरं तर कुस्ती हा शिस्तप्रिय खेळ आहे. मात्र खेळाडूवृत्ती न जपता गायकवाड आणि राक्षे यांनी बेशिस्तपणा दाखवल्याने कुस्तीगीर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Pruthviraj Mohol पृथ्वीराज मोहोळ ठरला 67 वा महाराष्ट्र केसरी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Kesari 2025 Result : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, सोलापूरचा महेंद्र गायकवाड अखेरच्या क्षणी चितपट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra-kesari-2025-pruthviraj-mohol-celebrated-by-carrying-his-father-on-his-shoulders-after-winning-shivraj-rakshe-video-maharashtra-kesari-2025-marathi-news-1342167
0 Comments