Weather Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात तापमानात चिंताजनक बदल होताना दिसत आहेत. केवळ तापमानच नाही तर दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा चटका जाणवत आहे.काही भागात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्यानं ढगाळ वातावरण आहे. यंदा उन्हाळा लवकर सुरु झाला असून कमाल तापमानाचा पारा (Temperature) आतापासूनच 35 अंश ओलांडत असल्याची नोंद होत आहे. तीव्र तापमान बदलाची सुरुवात झाली असून तापमानात वारंवार चढउतार होत आहेत. त्यामुळेच वाढत्या आरोग्याच्या कुरबुरी सुरु झाल्या असून संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे. दरम्यान, आता राज्यात उन्हाचा ताप वाढू लागलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 दिवसांत किमान व कमाल तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(IMD Forecast)

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून आता तापमानवाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. येत्या 3 दिवसांत किमान तापमानात 2-3 अंशांची वाढ होणार आहे. सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूर्व राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राजस्थानसह उत्तर प्रदेशच्या काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची चिन्हे आहेत. (Weather Update)

महाराष्ट्रात कोरडे व शुष्क हवामान

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 5 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानात उन्हाचा चटका अधिक जाणवणार असून उकाडा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, येत्या 2 दिवसात 2-3 अंशांनी वाढ होऊन नंतर तापमान हळूहळू कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय. येत्या 3 दिवसात विदर्भात फारसा बदल नसेल . पण त्यानंतर 2-3 अंशांनी घसरणार आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे.(Maharashtra Weather)

कुठे काय तापमान?

मुंबईत कुलाब्यात रविवारी (2 फेब्रुवारी) 20.8 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली.सांताक्रूझ भागात 18.6 अंश तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये 12-16 अंशांची नोंद झाली. पुण्यात 14-16 अंश सेल्सियस एवढं तापमान नोंदवलं गेलं. सोलापुरात बहुतांश ठिकाणी 18-20 अंशांची नोंद झाली.नगरमध्ये 15 अंश किमान तापमान होते.

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 15-21 अंशांची नोंद झाली. लातूरमध्ये रविवारी 21.1 अंश, बीडमध्ये 17 अंश तापमान होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17.5 अंश तर हिंगोलीत 16.9, नांदेडमध्ये 18.7 अंश तापमान होते.

हेही वाचा:

फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-imd-warns-of-rising-temperature-alert-in-the-next-3-days-in-maharashtra-1342164
0 Comments