<p>Maharashtra Live Updtes: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे आमदार सुरेश धस उपस्थित असतील. फडणवीस बीडमध्ये येणार असले तरी धनंजय मुंडे या दौऱ्यात उपस्थित नसतील. त्यांनी डोळ्याच्या शस्त्रक्रियेचे कारण देत या दौऱ्याला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आज बीडमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.</p> <p>राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गोंधळ, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेलं आक्षेपार्ह्य वक्तव्य आणि त्यानंतर मागितलेली माफी यांसारख्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच परदेशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये संक्षिप्त स्वरुपात घेता येणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-in-marathi-5th-feb-2025-cm-devendra-fadnavis-in-beed-delhi-assembly-election-voting-dhananjay-munde-suresh-dhas-anjali-damania-1342538
0 Comments