Maharashtra Weather: राज्यात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात मोठी वाढ होत असून आता तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. बुधवारी (5 फेब्रुवारी) पुण्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 अंशांपर्यंत गेलं होतं. तर किमान तापमानाचा पारा 15-18 अंश सेल्सियसपर्यंत गेला होता. (Temperature Update) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात बहुतांश ठिकाणी असेच तापमान होते. गेल्या काही दिवसांपासून पहाटेही फारसा गारठा जाणवत नसून 10 वाजेपासूनच उन्हाच्या झळा जाणवत आहेत. (IMD Forecast)

हवामान विभागाचा अंदाज काय?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर बांग्लादेशसह इशान्य भारतात असाम आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तरेत हिमालयीन भागात नव्याने पश्चिमी चक्रावात सक्रीय होणार आहे. त्यामुळे उत्तरेत दाट धुक्याची चादर आणि प्रचंड थंडी जाणवत आहे. राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरडे व शुष्क वातावरण आहे. पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. (Temperature Alert)

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान कसे?

महाराष्ट्रात येत्या पाच दिवसात कोरडे व शुष्क हवामान राहणार असून तापमानात येत्या 24 तासांत वाढ होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 2-3 अंशांनी वाढ होणार आहे. मराठवाड्यासह विदर्भात 34-38 अंशांची नोंद झाली. मुंबईसह कोकणात आर्द्रता जास्त (70-80%), तर विदर्भ-मराठवाड्यात ती कमी (40-50%) आहे.

विदर्भ आणि मराठवाडा: चंद्रपूर (38.2°C), सोलापूर (37.3°C), लातूर (36.3°C) येथे उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

कोकण: मुंबई कोलाबा (27.5°C) आणि रत्नागिरी (31.7°C) तुलनेने थंड, परंतु आर्द्रता अधिक होती

पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र: पुणे (35°C), नाशिक (32.9°C), कोल्हापूर (34.7°C) मध्यम तापमानात.

फेब्रुवारी महिन्यात उन्हाचा चटका वाढणार

राज्यात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे उन्हाचा प्रभाव वाढणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे.पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज दिलाय. फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार आहे.मुंबईसह किनारपट्टी भागात तसेच मध्य व उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा सरासरीहून अधिक राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/jIVXv0K and Kashmir Bank : फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-temperature-changes-expected-in-pune-marathwada-and-vidarbha-in-the-next-24-hours-read-imd-report-1342740
0 Comments