Ambernath News : अंबरनाथमध्ये उल्हास नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शांतीसागर रिसॉर्टच्या मागे वसत बंधाऱ्यावर हे दोन तरुण बुडाले आहे. त्यांचे मृतदेह अग्निशमन दलाने काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार दोन्ही तरुण हे पवई हिरानंदानीमध्ये राहणारे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, विवेक तिवारी आणि विनायक शहा अशी या दोघांची नावं असून ते अनुक्रमे 18 आणि 17 वर्षांचे आहेत. पवई हिरानंदानीमध्ये राहणारे हे दोघे मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या वसत गावाजवळील उल्हास नदीच्या बंधाऱ्यावर आले होते. तिथे उल्हास नदीत पोहताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकाने तिथे धाव घेत या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेमुळे पुन्हा एकदा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरणं धोकादायक असल्याची बाब समोर आली असून त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होतंय.

सोशल माध्यमांद्वारे आक्षेपार्ह वादग्रस्त पोस्ट, 21 जणांवर कारवाई

परभणी जिल्ह्यात सोशल माध्यमांद्वारे वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट, त्याचबरोबर स्टोरी कमेंट यावरून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्य पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली आहे. या प्रकरणात परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर 57 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या कुठल्याही पोस्ट, कमेंट करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देत समाजात शांतेतच वातावरण राहील या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले आहे. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यात सोशल माध्यमांद्वारे आक्षेप आणि पोस्ट करणे महागात पडणार आहे.

हे ही वाचा

'तुझी लायकीय का पाटलाशी सोयरीक करायची...'प्रेमप्रकरणाच्या रागातून धमकीचा फोन..बेदम मारहाण, भीतीपोटी तरुणानं घेतला गळफास,नांदेडमध्ये खळबळ

source https://marathi.abplive.com/news/ambernath-news-two-youths-drown-in-ulhas-river-in-ambernath-both-died-due-to-drowning-maharashtra-marathi-news-1350539
0 Comments