Devendra Fadnavis On BJP-Shiv Sena Alliance : भाजप-शिवसेनेची युती का तुटली यावरून राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे दावे केले जातात. विशेष म्हणजे यावर दिल्लीचे नेते देखील आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहे. अशातच या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करत या घटनेची पुन्हा एकदा आठवण दिली आहे. 2014 ला भाजप-शिवसेना युती नेमकी कशी तुटली? त्यासाठी काय खलबतं घडले? याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वत: दिली आहे.

या विषयी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2014 साली शिवसेनेला तेव्हा 147 जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं. पण विधाताच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं. शिवसेना 151 वर ठाम राहिले आणि युती तुटली, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता, मात्र...

शिवसेना 147 आणि भाजप 127 असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता, मात्र उद्धव ठाकरे 151 वर अडून बसले. आमचे मित्र शिवसेनेचे अध्यक्ष यांच्यासोबत आमचा तेव्हा बोलणं चालू होतं. आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो. मात्र त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता. तेव्हा ओमप्रकाश माथूर हे महाराष्ट्र प्रभारी होते यांनी अमित शहा यांच्या सोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशाप्रकारे चालणार नाही, अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्या सोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 असा फॉर्म्युला ठरला तर होईल, नाहीतर युती राहणार नाही. तेव्हा मी अमित शहा आणि ओमप्रकाश मधुर आम्ही आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो, बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता. या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टीमेटम दिलं आणि सांगितलं की 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 127 लढू. दोघांचेही चांगला निकाल लागेल दोघांचेही मिळून 200 च्या वर निवडून येतील तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल. पण विधात्याच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं.

ते कौरवांच्या मूडमध्ये आले अन् पाच गाव सुद्धा देणार नसल्याची भूमिका घेतली- मुख्यमंत्री

पण नाही युवराज यांनी घोषणा केली की 151 आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही. ते कौरवांच्या मूडमध्ये आले पाच गाव सुद्धा देणार नाहीत. पाचगाव नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत आहेत. लढाई झाली, मी तेव्हा प्रचारात होतो पण पाठीशी ओम प्रकाश माथुर आणि अमित शहा होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही 260 सीट लढलो. त्याआधी आम्ही ११७ पेक्षा जास्त जागा लढलोच नाही.

260 जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो आणि तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील 30 वर्षातील ही एकमेव पार्टी आहे. आणि याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमित शहा आणि ओम प्रकाश मातुर यांना जातं असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 26 तारखेला होणार निवड

source https://marathi.abplive.com/news/devendra-fadnavis-on-bjp-shiv-sena-alliance-how-did-the-bjp-shiv-sena-alliance-break-up-cm-devendra-fadnavis-told-the-inside-story-behind-the-scenes-maharashtra-politics-marathi-news-1350879
0 Comments