Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

राज्यात पारा वर चढला असून जवळपास सर्वच शहरांत सूर्यदेव आग ओकत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचे चित्र बघायला मिळात आहे. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण व दमट हवामानाला समोर जावं लागत आहे. अशातच वैदर्भीय लोकांची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) आज 11, 12 आणि 13 मार्चला विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा(IMD Forecast) दिला आहे. 12 आणि 13 मार्चला चंद्रपूर जिल्ह्यात देखील हिट व्हेवचा इशारा हवामान विभागाने दिला असून संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकीकडे वातावरणातील उष्णता वाढली आहे, तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणंही तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍स ठेवले होते. त्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केल्याचे दिसून आले होते. रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या स्टेट्समुळे ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले असून रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. तसेच, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी फॉलो करा एबीपी माझा...

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-of-11th-march-2025-maharashtra-budget-session-santosh-deshmukh-case-beed-suresh-dhas-walmik-karad-dhananjay-munde-pune-crime-political-updates-1348570
0 Comments