Maharashtra Weather Update: कोकणासह मुंबई पुणे तापलं, सिंधुदूर्ग रत्नागिरीला उष्णतेचा यलो अलर्ट, उर्वरित भागात IMD चा अंदाज काय?

Maharashtra Weather Update: राज्यात एकीकडे प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.दुसरीकडे हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांना तीव्र पावसाचा इशारा दिलाय. IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तरप्रदेश आणि आजूबाजूच्या भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या मध्यभागात कायम आहे. परिणामी राज्यात कोकण आणि गोवा भागात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामान असेल, असं सांगण्यात आलंय. उर्वरित भागात  तापमानात फारसा बदल राहणार नसल्याचा अंदाज आहे. (Weather) दरम्यान कोकणात सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित ठिकाणी तापमान चढेच राहणार आहे.(IMD Forecast)

राज्यात उष्णतेचा पारा कसा?

मुंबईत शनिवारी (1 मार्च) रोजी कमाल तापमान 35.5 एवढे होते. दक्षिण व उत्तर कोकणात साधारसा 31-36 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले. सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद बहुतांश ठिकाणी होत असून उत्तर व मध्य महाराष्ट्रात 34-38 अंशांची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात प्रचंड रखरख वाढली असून 35-36 अंशांपर्यंत बहुतांश ठिकाणी तापमान नोंदवले  गेले. अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरसारख्या विदर्भातील इतर जिल्ह्यांतही तापमान 35 अंशाच्या वर गेले आहे, त्यामुळे या भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. मराठवाड्यातही उन्हाची तीव्रता जाणवते. नांदेड, लातूर आणि बीड येथे 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाची लाट जाणवत आहे. पुणे, सोलापूर आणि सातारा येथे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे.

येत्या पाच दिवसात अंदाज काय?

हवामान विभागाने कोकण व मुंबईला उष्णतेचे इशारे दिले होते. आता उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा दिला आहे. येत्या तीन ते चार दिवसात कोकण विभागात साधारण असेच हवामान असेल. रनगिरी आणि सिंधुदूर्गात सर्वाधिक उष्णता जाणवेल असं हवामान विभागानं सांगितलंय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामानात फारसा बदल नाही.

हेही वाचा:

ऑन ड्युटी डुलकी लागली तर तो काही गुन्हा होत नाही, 'त्या' कर्मचा-याला हायकोर्टाचा मोठा दिलासा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-mumbai-pune-heat-up-yellow-alert-for-sindhudurg-ratnagiri-imd-forecast-for-other-regions-1346959

Post a Comment

0 Comments