ABP Majha Marathi News Headlines 7AM Top Headlines 7 AM 01 May 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7AM Top Headlines 7 AM 01 May 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स

६६व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर मुंबईतील हुतात्मा चौकात शहीदांना मानवंदना देणार तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचं उद्घाटन करणार, ३० देशांचे मंत्री वेव्ह्ज शिखर परिषदेत सहभागी होणार

पंतप्रधानांच्या निवासस्थानी काल रात्री आणखी एक उच्चस्तरीय बैठक, परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची उपस्थिती...पाकिस्तानी विमानांसाठी २३ मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद

एनआयएचं पथक आज पुन्हा बैसरन खोऱ्यात, संशयितांची चौकशी सुरु.. तर हल्ल्याच्या एक आठवडा आधी दहशतवाद्यांकडून अनेक ठिकाणांची रेकी, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, पाकिस्तानला आवाहन

मृत्यू झाल्याचा अभिनय केल्यानं दहशतवादी हल्ल्यातून बचावलो, पुण्यातील चार कुटुंबांनी सांगितली बैसरन खोऱ्यातली कहाणी, दहशतवाद्यांशी नकळत संवाद साधल्याचाही दावा

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-narendra-modi-daura-1357004

Post a Comment

0 Comments