Bhiwandi Crime News : सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ, मित्रानेच केली मित्राची हत्या; भिवंडीमधील घटना, आरोपीस मध्यप्रदेशातून बेड्या

Bhiwandi Crime News : सहकारी मित्र दारूच्या नशेत सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ करत असल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या (Crime News) केल्याची घटना शहरातील दत्तु नगर भादवड येथे घडली होती. या प्रकरणी शांतीनगर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी (Bhiwandi Crime) गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासातून या हत्येतील आरोपीच्या मुसक्या मध्यप्रदेशातील कटनी येथून आवळून आरोपीस अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलिसांनी दिली आहे.

शाब्दिक वाद विकोपाला, आरोपीस मध्यप्रदेशातून बेड्या

पुढे आलेल्या माहितीनुसार, रवीकुमार विष्णू सिंग (वय 29 वर्ष रा. कदमटोली जिल्हा जसपुर, राज्य छत्तीसगढ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर चित्तरंजन नागेशिया (वय 30 वर्ष राहणार कदम टोली) असे हत्या झालेल्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. आरोपी रविकुमार आणि मयत चित्तरंजन हे दोघेही एकमेकांचे साथीदार असून भादवड येथील दत्तु नगर परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र दारू पिण्यास बसले असताना मयत चित्तरंजन याने आरोपी रवी कुमार यास आई-वडिलांवरून शिवीगाळ केली होती. या गोष्टीचा राग म्हणून मनात धरून रविकुमार याने दगडाने ठेचून व धारदार हत्याराने चित्तरंजन याची हत्या केली व मध्यप्रदेश येथे पळून गेला होता.

दरम्यान, भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी रविकुमार हा मध्य प्रदेश येथे पळून गेला असल्याची खबर मिळताच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार पोलीस यांच्या पथकाने आरोपीचा तपास सुरू केला. यात मध्य प्रदेश येथील कटनी रेल्वे स्टेशन येथून सीआरपीएफ पोलिसांच्या मदतीने पळून जाण्याचा तयारीत असलेला आरोपी रवीकुमार यास अटक केली.सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/FOnQTdP Crime : साधूची वेशभूषा करून वृद्ध इसमाला गंडवले, सोन्याची चेन आणि अंगठी घेऊन पसार झालेल्या तीन भामट्यांना अटक

<a href="https://ift.tt/32JSQg5 Kasle: परळीत EVM सोबत छेडछाड, न बोलण्यासाठी 10 लाख पाठवले... होय, वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची धनंजय मुंडेंची ऑफर होती; निलंबित PSI  रणजीत कासलेंनी पुरावा दाखवला

source https://marathi.abplive.com/news/bhiwandi-crime-news-friend-ended-friend-life-due-to-constantly-abused-by-parents-accused-arrested-from-madhya-pradesh-maharashtra-marathi-news-1354904

Post a Comment

0 Comments