Special Report On Dhananjay Munde : धनंजय मुंडे सार्वजनिक मंचावर यायचं टाळतायत? चर्चांना उधाण

<p>Special Report On Dhananjay Munde : धनंजय मुंडे सार्वजनिक मंचावर यायचं टाळतायत? चर्चांना उधाण</p> <p>&nbsp;बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली. त्याच दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे भगवानगडावर गेले होते. त्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी असल्याची म्हटले होते. त्यानंतर शास्त्री यांच्यावर देखील टीका झाली होती, त्यानंतर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवान गडावर जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे.&nbsp;</p> <p>भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यात आली आहे. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका. मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावं एवढेच बोलू, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटलं आहे, तसेच नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे उपस्थित का राहिले नाही याचे कारण ही महंतांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे आज आपल्या कार्यक्रमाला येणार होते. मात्र त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला, असं कारण नामदेव शास्त्री यांनी सांगितलं आहे. दोन तास हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली नाही असंही ते पुढे म्हणाले.</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-on-dhananjay-munde-not-present-narali-saptah-maharashtra-politics-1354911

Post a Comment

0 Comments