Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Live Updates:</strong> उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली. तर पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी करणार आहेत. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-updates-21-april-2025-raj-thackeray-and-uddhav-thackeray-alliance-shivsena-ubt-mns-devendra-fadnavis-eknath-shinde-maharashtra-politics-1355403

Post a Comment

0 Comments