Nagpur Crime News : नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या (Pachpavali Police Station) हद्दीत एकाची निर्घृणपणे हत्या झाली आहे. शेरा सूर्यप्रकाश मलिक (वय 33) असे हत्या झलेल्या या इसमाचे नाव आहे. तर गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असे हत्या (Nagpur Crime News) करणाऱ्या आरोपींचे नावं आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत नाईक तलाव परिसरात ही घटना घडली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना (Crime News) पोलिसांनी घटनेनंतर काही तासातच अटक केलेली आहे. अनैतिक संबंधातून शेराची हत्या झाल्याचे करण प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयातून हत्या?

मुख्य आरोपी गितेश उके याचे शेरा मलिकच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब ज्यावेळी शेरा याला समजली त्यावेळी शेराने गितेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गितेशची काहीही ऐकण्याची तयारी नव्हती. दोघांमधील वाद हा वाढत गेला. दोघेही एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.

गळ्यावर कोयत्याने 11-12 वार, शेरा जागीच ठार

शेरा मलिक आपल्याला ठार मारेल, या भीतीने गितेशने शेराच्या हत्येचा कट रचला. या कामात गितेशने त्याचा मित्र भोजराज कुंभारेची मदत घेतली. भोजराज याला शेरा मलिकची माहिती काढण्याचे काम सोपवले. भोजराजने शेरा घरी असल्याची खबर दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी शेराच्या घरी गेले. त्यानंतर गितेशने शेरा याला बाहेर बोलावले. शेराला आरोपींच्या मनात काय सुरू असले याची पुसटशी कल्पना आली नाही. तो बाहेर येताचं आरोपींनी त्याच्या गळ्यावर कोयत्याने 11-12 वार केले. शेरा जागीच ठार झाला. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र उपराजधानी नागपूर शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने हादरले आहे.

ग्राहक न्यायालयात चक्क घोरपड शिरली, एकच धांधल उडाली

चंद्रपूर ग्राहक न्यायालयात चक्क एका नव्या वन्यजीव पाहुण्याने आगमन केलं आहे. हा वन्यजीव पाहुणा म्हणजे घोरपड होय. न्यायालय परिसरात घोरपड शिरल्याने कामकाज काही काळ ठप्प झाले होते. ग्राहक न्यायालयाच्या मागच्या भागात वनविभागाची रामबाग वन वसाहत आहे. जंगल सदृश्य या भागातून ही घोरपड जिल्हाधिकारी कार्यालय परिसराच्या आवारात असलेल्या ग्राहक मंच न्यायालयात शिरल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर इको-प्रो या वन्यजीव प्रेमींच्या संस्थेनी सुरक्षित या घोरपडीला पकडून केले निसर्गमुक्त केले. मात्र या घटनेने काही काळ परिसरात एकच धांधल उडाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

वडिलांकडे सोडतो सांगत अल्पवयीन मुलीला फसवले, दोन वेळा अत्याचार, मालवणीतील तरुणाला अटक

source https://marathi.abplive.com/crime/nagpur-crime-news-one-man-life-ended-on-suspicion-of-having-an-immoral-relationship-with-his-wife-case-file-in-pachpavali-police-station-nagpur-marathi-news-1355580
0 Comments