Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण 4 जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले 5 पर्यटक जखमी झालेत. तर एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे या हल्ल्यात जखमी झालेत.

#WATCH | J&K | Locals in Akhnoor's Khod village hold a candle march against the terror attack on tourists.#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/PCsqNbwgSR
— ANI (@ANI) April 22, 2025

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं आवाहन-

जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी, त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा क्रूर हल्ला, VIDEO:

संबंधित बातमी:

<a href="https://ift.tt/3LmVADk Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला, पहाटे भारतात पोहोचणार, नियोजित वेळेपूर्वी दौरा संपवला

source https://marathi.abplive.com/news/jammu-kashmir-pahalgam-terror-attack-three-people-from-dombivli-have-died-in-a-terrorist-attack-in-jammu-and-kashmir-marathi-news-1355755
0 Comments