Maharashtra News LIVE Updates : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. अशातच आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अगदी सुरुवातीपासून लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. आपल्याला जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोप सुरेश धसांनी केला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामुळे सुरेश धसांवरदेखील आरोप होत होते. खोक्यावर प्राण्यांची तस्करी, शिकारीचे आरोप आहेत. आणि या सर्व प्रकरणांमध्ये खोक्याला धसांचा पाठिंबा होता, असं दाखवून आपली हत्या घडवण्याचा कट होता असा आरोप धसांंनी केलाय. खोक्याने सुरेश धसांंना हरणाचं मांस कसं पुरवलं, हे बिश्नोई समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.

राज्यात कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण

त्यासोबतच आता राज्यात कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात एकूण 3 लाख किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग आहेत. यापैकी 1 लाख 12 हजार किलोमीटर सार्वजनिक बांधकाम विभाग देखबाल करतं. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणारा निधी आणि त्यातून या देखभाल निधी आणि मागील थक्कबाकी शक्य नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका, त्यामुळे नवीन दक्षता नियमावली जारी करण्यात आलेली आहे.

देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा संक्षिप्त स्वरुपात... दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-news-live-updates-today-2nd-april-2025-beed-santosh-deshmukh-case-walmik-karad-jail-war-with-mahadev-gitte-crime-news-devendra-fadnavis-eknath-shinde-kunal-kamara-political-updates-in-marathi-news-1352290
0 Comments