ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 02 April 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थ अजित पवारांची भेट घेणार तर धनंजय मुंडे उपस्थित राहणार का याची उत्सुकता

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत वडील सतीश सालियन यांचे गंभीर आरोप

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मुक्काम जेलमध्येच, कोर्टानं पुन्हा जामीन नाकारला, कोरटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल, सरकारी वकिलांचा युक्तीवाद

लोकसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणा विधेयक, दुपारी बारा वाजल्यापासून सुरु होणार आठ तासांची चर्चा, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न...

बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार?,वक्फ सुधारणा विधेयकावरून फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं

बुलढाण्यात शेगाव-खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू तर २४ जखमी

ऐन उन्हाळ्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, कोकणातही अवकाळी पावसाची हजेरी, तर कोल्हापूर, साताऱ्यात गारपीट, अवकाळीमुळे शेतीपिकाचं नुकसान, जनजीवनावरही परिणाम

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-disha-salian-case-udpate-1352295
0 Comments