Nagpur Crime News : खळबळजनक! भर बाजारात तरुणावर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर; उपराजधानी नागपूर हादरलं!
Nagpur Crime News : राज्याची उपराजधानी नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहराच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शहराच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर यातील आरोपींचा ही पोलीस सध्या शोध घेत आहे.
अवैध धंद्यांच्या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता
पुढे आलेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान दुचाकी वर आलेल्या चार हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ सुरू केली, आणि एका तरुणाबद्दल चौकशी करत गोळीबार केला. त्यात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची  माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींवर दगडफेक ही केल्याची माहिती आहे. दरम्यान, अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र  भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वे स्थानकावर 9 लक्ष 60 हजारांची रोकड जप्त; गोंदिया रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
या अनुषंगाने गुप्त माहितीच्या आधारे विभागीय टास्क पथकाचे प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक धर्मेंद्र कुमार व गुन्हे गुप्तचर शाखा गोंदिया, रेल्वे तर्फे गोंदिया रेल्वेस्थानकावरील स्टेशन प्रबंधक कार्यालयासमोर फलाट क्रमांक 3 आहूजा याची चौकशी केली असता त्याच्या जवळील काळ्या-निळ्या रंगाच्या हँडबॅगमध्ये 8 लाख 10 हजार रुपये व व त्याच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये असे 9 लाख 60 हजार रुपये आढळून आले. यावर त्यास विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. यावर पथकाने त्यास ताब्यात घेऊन सदर रक्कम जप्त केली व बेकायदेशीर तस्करी करीत असल्याकारणावरून नागपूरच्या आयकर विभागाला सुचना देण्यात आली. पुढील कारवाई आयकर विभागाकडून सुरू आहे..
इतर महत्वाच्या बातम्या
<a href="https://ift.tt/I0zu95g Crime:महाराष्ट्र हादरला! महिलेचं मुंडण, भुवया काढत विद्रूपीकरण; नणंद मेहुण्याचं प्रेमप्रकरण जुळलं, बिंग फुटू नये म्हणून संशयाचं बीज पेरलं
source https://marathi.abplive.com/crime/nagpur-crime-news-incident-of-firing-in-a-crowded-market-in-prakash-nagar-in-mankapur-police-station-limits-one-died-on-the-spot-one-was-in-critical-condition-marathi-news-1352585
Post a Comment
0 Comments