Nashik News : नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात;बस जागीच पलटी, 14 जण जखमी

Nashik News : नाशिकमधून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला सिन्नर तालुक्यातील दोडी गावाजवळ अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकान बस रस्त्याच्या डाव्या बाजूला नेली. मात्र रस्त्यावर अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने बस जागीच पलटी झाली आहे. या घटनेत 13 प्रवासी आणि वाहक असे 14 जण जखमी झाले होते. त्यातील पाच जणांवर ग्रामीण  रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. तर इतर किरकोळ जखमी होते त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आल आहे. काल (10 एप्रिल) रात्री दहा साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली असून पुढील कारवाई आता पोलीस करत आहे.

अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने हटवली, सुदैवानं जीवितहानी टळली

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसला  क्रेनच्या सहाय्याने हटवली जाणार आहे. तर जे प्रवासी पुण्याच्या दिशेने जाणार होते त्यांच्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली असून सर्व प्रवासी आता मार्गस्थ होत आहे. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलेत, तर पोलिस प्रशासन आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करून पुढील कार्यवाही केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी  भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/OZK6F2m News : इन्स्टा पोस्टला रिप्लाय देणं पडलं महागात; दोघांची सटकली, तरुणाला एकट्यात पकडलं, परत दिसला तर तुला जिवंत सोडणार नाही म्हणत धुतलं

source https://marathi.abplive.com/news/nashik-news-terrible-accident-in-st-bus-going-from-nashik-to-pune-bus-overturns-on-the-spot-14-injured-maharashtra-marathi-news-1353747

Post a Comment

0 Comments