नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) नवी दिल्लीत सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.दरम्यान, या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का उपस्थित राहिले नाहीत? या बाबत स्वता: ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि अरविंद सावंत हे दोन्हीही सभागृह नेते पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने बैठकीला हजर राहू शकले नाहीत असे स्पष्टीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितलंय. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. मात्र ही विनंती नाकारत बैठकीनंतर यावर विस्तृत चर्चा करण्याचं सरकारकडून स्पष्टीकरण दिले असल्याचे ही त्यांनी सांगितलं.

किरण रिजीजू यांच्याकडून निरोप आला, पण....

पहलगाममध्ये जी घटना घडली तिचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला काल (24 एप्रिल) सकाळी साडेआठ वाजता सर्वपक्षीय बैठक केंद्र सरकारने बोलावली आहे, असा निरोप किरण रिजीजू यांच्याकडून आला, त्यांनी फोन केला होता. त्यांना मी सांगितलं की मी बाहेरगावी लोकसभेच्याच ज्या आमच्या स्टॅंडिंग कमिटी असतात त्यांच्या दौऱ्यावर आहे आणि सध्या ज्या ठिकाणी आहे तिथून पोहोचणे कठीण आहे. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांना सांगा म्हणून बोलले. पण संजय राऊत सुद्धा याच पार्लमेंटरी स्टॅंडिंग कमिटीच्या कामानिमित्त बाहेर आहेत. त्यावेळी आम्ही दुसऱ्या कोणत्या खासदाराला या बैठकीला आमच्याकडून पाठवू का? असं विचारले असता, त्यावेळी त्यांनी सांगितलं की दोन्ही सभागृहाचा नेता किंवा तुमच्या पक्षाचे नेते या बैठकीला आले पाहिजे.असे ते म्हणाले असल्याचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

केंद्र सरकार जी काही पावलं उचलेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा- अरविंद सावंत

या सगळ्यानंतर मी त्यांना एक पत्र आणि मेसेज केला. त्यामध्ये गोपनीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्ही या बैठकीला उपस्थित राहू शकतो का? असे विचारलं. मात्र त्यावर किरण रिजीजू त्यांनी या बैठकीनंतर यावर सविस्तर बोलेल असं सांगून धन्यवाद केलं. मात्र तिकडे शिवसेना अजूनही काही लोकांनी ओळखली नाही आणि काही लोकांना याचे राजकारण करायचं आहे. आम्ही अंगावर खेळणारी लोक आहोत अंगावरून झटकणारे नाहीत. असे घाणेरडे आरोप करणं आणि त्यावरून राजकारण करण हे चुकीचं आहे. वस्तुस्थिती कळावी म्हणून ही माहिती दिली केंद्र सरकार जी काही पावलं या सगळ्या घटनेनंतर उचलेल त्याला आमचा पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा असेल. आम्ही काही प्रश्न सुरक्षित संदर्भात उपस्थित केली आहेत असेही खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी यावेळी सांगितलंय.

हे ही वाचा

सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं? किरेन रिजिजू यांनी दिली माहिती

source https://marathi.abplive.com/news/politics/pahalgam-terror-attack-all-party-meeting-held-at-delhi-arvind-sawant-gave-an-explanation-over-why-uddhav-thackeray-shiv-sena-mps-not-present-maharashtra-politics-marathi-news-1356079
0 Comments