Top 100 Superfast News | टॉप 100 बातम्या | 6 AM | 28 April 2025 | Maharashtra News | ABP Majha

Top 100 Superfast News | टॉप 100 बातम्या | 6 AM | 28 April 2025 | Maharashtra News | ABP Majha

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्या संदर्भात होणार चर्चा.

काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंह यांच्यासोबत पार पडली बैठक, या बैठकीनंतर आज राजनाथ सिंह पंतप्रधान मोदींची भेट घेणार,पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व.

पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट.

महाराष्ट्रातील १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती.

खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना 'नागरी शौर्य' पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची केली मागणी.

पाकव्याप्त काश्मीर काबीज करा, हवं तर युद्ध करा, अगदी सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती केली तरी चालेल, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रामदास आठवलेंचा आक्रमक सल्ला.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-top-100-superfast-news-6-am-pahalgam-terror-attack-kashmir-terror-attack-28-april-2025-abp-majha-1356522

Post a Comment

0 Comments