ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 23 May 2025

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अखेर अटक, राजेंद्र हगवणेला सात दिवसांनी बेड्या, बावधन पोलिसांची कारवाई

वैष्णवीच्या बाळाला घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा, कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणेचे भाऊ संजय हगवणे चौकशीसाठी ताब्यात....राजेंद्र हगवणेला पळून जाण्यात मदत केल्याचा पोलिसांना संशय

मजुरीचे ६०० रुपये मागितल्याच्या कारणावरून शेतमजुराला बेदम मारहाण...हिंगोलीच्या शिरड शहापूर गावातील प्रकार...लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर...

नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग गेल्या ५३ तासांनंतरही धुमसतीच.. कंपनीपासून १ किलोमीटर परिसर प्रशासनाकडून रिकामा...प्रोपिलीनच्या टाकीपर्यंत आग न पोहोचू देण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न...

हेरगिरीच्या आरोपात दिल्लीत अटक केलेल्या हारूनचे पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी संबंध...भारतातून हद्दपार झालेल्या मुझम्मिलच्या सूचनेवर करायचा काम...अटकेतील तुफैल नामक आरोपीला कोर्टात हजर करणार...

गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता...अनेक गुपितांचा उलगडा होणार...तर गजाला आणि यामिन मोहम्मदला आज न्यायालयात करणार हजर...

तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यासमोरच उकळतं का?, पंतप्रधान मोदींच्या भाषणावरून राहुल गांधींचा सवाल...ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण सुरूच असल्याचं चित्र...

ऑपरेशन सिंदूरवरून सरकारला घेरण्यासाठी राहुल गांधींनी बोलावली पक्षाची बैठक...१४० बड्या नेत्यांसोबत सरकारला घेरण्याची रणनीती आखणार...परराष्ट्र धोरण, युद्धबंदी आणि मध्यस्थीच्या मुद्द्यावर चर्चा...

अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय... कॅम्पसमध्ये हिंसाचार, ज्यूविरोधी भावनांना प्रोत्साहन, चिनी कम्युनिस्ट पक्षाशी समन्वय साधल्याचा विद्यापीठावर आरोप

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके...राज्यातील १ कोटी विद्यार्थी लाभार्थी...केंद्राकडून राज्याच्या शिक्षण विभागाला ३१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर...

रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी...तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-07-am-top-headlines-23-may-2025-rajendra-hagawane-arrested-vaishnavi-hagawane-case-pune-marathi-news-abp-majha-1360470

Post a Comment

0 Comments