ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7AM 03 May 2025

भारतीय आक्रमणाच्या भीतीने पाकिस्तान बिथरला, या आठवड्यात जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत,सुत्रांची माहिती

चिनाब नदीचं पाणी रोखा, पाकिस्तानी गोळीबारामुळे संतापलेल्या सीमेवरील ग्रामस्थांची मागणी, ग्राऊंड झिरोवरून माझाचा स्पेशल रिपोर्ट

पाकिस्तानसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचं शक्तिप्रदर्शन, यूपीतील गंगा एक्सप्रेसवेवर एअर शो... राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचं दिवसा आणि रात्रीही लॅण्डिंग...

भारतामध्ये आता माणुसकी शिल्लक राहिली नाही, सपाचे आमदार अबू आझमी पुन्हा बरळले, देशात धर्म विचारून कारवाई होत असल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान...शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय का? याची उत्सुकता

मुख्यमंत्री व्हायचंय आहे पण योग आला नाही...अजित पवारांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली मनातली इच्छा... महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी अजितदादा आशावादी..

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-abu-azami-on-palestine-controversy-1357318
0 Comments