Beed Accident: बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

Beed Accident News : बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात (Accident) झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले  आहे.

अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडले

पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झालाय. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात बस अडकली, अन् पुढे...

मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात बस अडकली असल्याच्या प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र बार्शीतल्या या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल (26 मे )रात्री तुळजापूर-बार्शी रोडवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पावसाच्या पाण्यात अडकली. ही बस तुळजापूरहून बार्शीच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र बार्शी शहरापासून दोन किलोमीटरवर असलेल्या रेल्वे पुलाखाली ही बस अडकली. प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अक्षरशः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पाणी शिरलं.

बसमध्ये पाणी शिरल्यामुळे बस देखील बंद पडली. अचानक पाणी बसमध्ये शिरू लागल्याने प्रवाशांच्या चिंतेत काही वेळासाठी भर पडली होती. मात्र बार्शी शहर पोलीस आणि अग्निशमन दलाने तत्परता दाखवत या सर्व 27 प्रवाशांना बाहेर काढलं. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास घेतला. दरम्यान बस मध्येच बंद पडल्यामुळे काही वेळ तुळजापूर - बार्शी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/Op8hMsG: नगरपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा, न्यायाधीशांनी चार दिवस प्यायले चक्क साप मेलेले दूषित पाणी; गडचिरोलीच्या अहेरी येथील प्रकार

source https://marathi.abplive.com/news/beed-accident-news-terrible-accident-on-garhi-bridge-who-survived-the-accident-but-was-crushed-by-a-truck-six-people-died-tragically-on-the-spot-maharashtra-marathi-news-1361127

Post a Comment

0 Comments