Breaking News Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर

<p><strong>Breaking News Updates: </strong>पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा ISIच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर ISI ची करडी नजर आहे. तसेच महाराष्ट्राला त्रासदायक ठरुनही अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा अडमुठेपणा दिसून येतंय. सांगली-कोल्हापूर सीमेवर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच आणखी तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. त्यातच आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यासह राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...एका क्लिकवर</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-updates-19-may-2025-india-vs-pakistan-war-beed-opration-sindhoor-shivraj-divate-maharashtra-politics-devendra-fadnavis-1359792

Post a Comment

0 Comments