Abp Majha Impact नागपूर : एबीपी माझाच्या बातमीचा जोरदार इम्पॅक्ट नागपुरात पाहायला मिळाला आहे. एबीपी माझाच्या बातमी नंतर पाकिस्तानी (Pakistan) कवीच्या कवितेच्या माध्यमातून भारतातील विद्यमान सत्ता उलथवून लावण्याच्या संदेश देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या त्या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 मे रोजी नागपुरात डावे विचारक 'विरा साथीदार' यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात 'समता कला मंच' च्या वतीने पाकिस्तानी कवी 'फैज अहमद फैज' यांची "हम भी देखेंगे" ही कविता सादर करण्यात आली होती. कवितेच्या सादरीकरणानंतर लगेच मंचावरून "पाकिस्तान मध्ये जिया उल हक या हुकूमशहाची सत्ता ज्या पद्धतीने उलथवून लावण्यात आली, त्याच पद्धतीने भारतातही विद्यमान सत्ता उलथवून लावण्याची गरज असल्याचे" विश्लेषण करण्यात आले होते.

म्हणजेच एका प्रकारे पाकिस्तान मधील हुकूमशाही सत्ता आणि भारतातील विद्यमान सत्ता समसमान असल्याची तुलना करण्यात आली होती. त्यामुळे सध्या भारत सीमेवर पाकिस्तान विरोधात (India Pakistan War) आजवरचा सर्वात मोठा संघर्ष करत असताना देशातील काही डाव्यांना अशा संकटकाळातही देशाला अस्थिर करण्याचे स्वप्न का पडत आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता.

देशाविरोधात कट रचून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

दरम्यान, 14 मेच्या सकाळी एबीपी माझाने त्यासंदर्भात बातमी दाखवताच, देशात नक्षल पिडीतांसाठी काम करणाऱ्या "जनसंघर्ष समिती"ने त्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यामध्ये एबीपी माझाच्या बातमीचा उल्लेख ही करण्यात आला होता. जनसंघर्ष समितीच्या तक्रारीनंतर नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत प्राथमिक चौकशी केली. आणि त्या चौकशीअंती या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. देशाविरोधात कट रचून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

समता कला मंच विरोधात कठोर कारवाईची मागणी

जनसंघर्ष समितीने या प्रकरणी आयोजक तसेच नाहक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समता कला मंच विरोधात कठोर कारवाईची मागणी जन संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि या प्रकरणाचे तक्रारकर्ते दत्ता शिर्के यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/bU0PRkz Ubale : प्रसिद्ध लेखक आणि 'गार्गी'च्या दिग्दर्शकाची नागपुरात आत्महत्या, कर्जामुळे जीवन संपवल्याची व्हॉट्सअॅपवर नोट लिहिली

उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात, अमित शाह यांना बाळासाहेबांनी मदत केली का? नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

source https://marathi.abplive.com/crime/pakistani-poet-poetry-event-controversy-with-message-of-overthrowing-the-current-government-in-india-case-filed-against-organizers-samata-kala-manch-in-nagpur-1359643
0 Comments