Chandrapur News : ताडोब्यात 'सीएम' चीच दहशत; अधिवासाच्या लढाईत तिघांना पाठवलं यमसदनी; राज्यातील पहिली अन् एकमेव घटना

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari Tiger Reserve) म्हणजे वाघांचं नंदनवन. मात्र याच ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील छोटा मटका म्हणजेच सीएम या वाघाने झुंजित ब्रम्हा या तरुण वाघाचा बळी घेतला आहे. वाघांची एकमेकांसोबत होणारी टेरिटोरियल फाईट म्हणजेच अधिवासाची लढाई तशी काही नवीन नाही. मात्र एखाद्या वाघाने आपला अधिवास आणि प्रेयसी यांच्यावर अधिराज्य कायम ठेवण्यासाठी तुल्यबळ अशा तीन नर वाघांचा जीव घेण्याची कदाचित ही आपल्या राज्यातील पहिली आणि एकमेव घटना आहे. ताडोबाच्या रामदेगी या परिसरात छोटा मटका या वाघाचा अधिवास असून नयनतारा ही त्याची साथीदार वाघीण आहे. आपला अधिवास आणि प्रेयसी नयनतारा यांच्या आड येणाऱ्या प्रत्येक वाघाचा छोटा मटका या वाघाने फडशा पाडला आहे.

राज्यातील पहिली अन् एकमेव घटना

वय वर्ष 6 इतके असलेल्या सीएमचा ताडोबाच्या रामदेगी या परिसरात अधिवास आहे. दरम्यान त्याने ब्रम्हा या अतिशय तरुण आणि धिप्पाड अशा वाघाचा अलीकडेच फडशा पाडल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे याआधी देखील छोटा मटकाने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय प्रसिद्ध अशा बजरंग आणि मोगली या दोन वाघांना टेरिटोरियल फाईट म्हणजेच अधिवासाच्या लढाईत ठार केले आहे. तर ताला, रुद्रा आणि बली या 3 वाघांना परास्त करून टेरिटरीच्या बाहेर हाकलून लावले आहे.

पर्यंत 3 वाघांच्या नरडीचा घोट

दरम्यान, आता पर्यंत 3 वाघांच्या नरडीचा घोट घेणारा सीएम हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय प्रसिद्ध वाघ आहे. प्रतिस्पर्धी नरांसोबत झालेल्या झुंझीत सीएम देखील प्रत्येकवेळी जबर जखमी झाला आहे. मात्र प्रत्येक वेळी पुन्हा नव्या ताकतीने त्याने आपलं राज्य पुनर्स्थापित केलं आहे. अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक  डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

वाघाच्या हल्ल्यात 5 दिवसात 6 महिलांचा मृत्यू

दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह रवाना करण्यात आला. मात्र या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव दिसून आला. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणाऱ्या 6 महिलांचा गेल्या 5 दिवसात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/DLauEjT Crime News : पुण्यातील जंगलात शिकारीचा पर्दाफाश! अनेक शस्त्रांसह मोठं घबाड उघड; एका तरुणाला अटक

source https://marathi.abplive.com/news/chandrapur-tadoba-andhari-tiger-reserve-territorial-fight-between-tigers-terror-of-cm-ended-three-tiger-due-to-battle-for-residence-maharashtra-marathi-news-1359321

Post a Comment

0 Comments