Maharashtra Weather Update: हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागाला अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर आगामी तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाचा इशारा (Rain Alert) कायम असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, या कालावधीत संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हवेच्या दाबात घट आणि नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती आहे. त्यापासून उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे.

3 हजार 454 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान

दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. 600 गावतील जवळ जवळ 14 हजारहुन अधिक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी जवळपास 3 हजार 454 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या स्थानिक यंत्रणेकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरूच असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने आंबा, कांदा आणि भाजीपालाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर फळभागांचे देखील नुकसान झाले असून अजून दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. एकीकडे कांद्याचे दर घसरत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे देखील कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात सुरगाणा, पेठ, दिंडोरी, त्रंबकेश्वर, सिन्नर तालुकासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याचे बघायला मिळाले आहे.

नाशिकमध्ये पंचवीस पेक्षा जास्त झाडांची पडझड

नाशिकला पावसाचा दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यावेळी कालदुपार पासून रात्री उशिरापर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये नाशिकच्या नवीन नाशिक, सिडको, कामटवाडे परिसरात झाडांची मोठी पडझड झाली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. जवळपास पंचवीस पेक्षा जास्त झाडं शहरात विविध ठिकाणी पडले तर, कार, रिक्षा, दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. काहीठिकाणी लाईटचे खांबही पडले होते त्यामुळे शहरात रात्रभर काही परिसरात बतिगुल होती. एकूणच नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे काहीसे जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/pM4zbqa Pakistan War Karachi Port: भारतीय नौदल कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार होते, व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद यांचं शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं उत्तर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-update-unseasonal-rain-hits-nashik-14-thousand-in-600-villages-of-farmers-imd-rain-alert-warned-of-heavy-rains-rain-forecast-1358705
0 Comments