ABP Majha Headlines : 07 AM : 05 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पंतप्रधान मोदींचा सैन्याच्या शौर्याला सलाम.. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, थांबलं नसल्याचं जाहीर... पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर निर्णायक हल्ला होईल, मोदींचा इशारा

अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं...दहशतवाद, व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही.. पाकिस्तानसोबत चर्चा केवळ पीओकेवरच, मोदींची स्पष्टोक्ती

भारत पाकिस्तानच्या DGMO ची हॉटलाईनवर चर्चा, सीमेवर एकही गोळी चालणार नाही यावर एकमत, दोन्ही बाजूंच्या फॉरवर्ड पोस्टवरील सैनिकांची संख्याही कमी करणार

भाजपची आजपासून २३ मेपर्यंत तिरंगा यात्रा, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात रॅली, वरिष्ठ नेते सहभागी होणार

जम्मूच्या दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयं आजपासून सुरु होणार, तर कठुआ, जम्मू, राजौरी, पूंछ, सांबा आणि उधमपूरमधील शाळा मात्र बंद राहणार

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार.... अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार.

राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार

भारत-पाकिस्तान संघर्षामुळे स्थगित झालेले आयपीएलचे सामने १७ मे पासून पुन्हा सुरु होणार, ३ जूनला अंतिम सामना, बीसीसीआयची घोषणा..

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-07-am-05-may-2025-maharashtra-news-pm-modi-on-pakistan-ind-vs-pak-news-1358836

Post a Comment

0 Comments