Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले

Buldhana Accident news: बुलढाण्यातील नांदुरा शहरात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, बुलढाण्यातील (Buldhana News) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक (National Highway) सहावर हा अपघात घडला. पहाटे साडेचार वाजता नांदुरा शहराजवळ आर्टिगा कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. (Maharashtra Road Accident)

ट्रकच्या जोरदार धडकेमुळे कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे कारमधील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढणे अवघड झाले होते. मात्र, नांदुरा (Nandura News) येथील जीवन रक्षक पथकाने दोन तासांची मेहनत करुन गाडीतील जखमी आणि मृतांना बाहेर काढले. भीषण धडकेमुळे कारमधील सर्व प्रवाशी निपचित पडले होते. त्यामुळे जीवन रक्षक पथकाला कारच्या छपराचा पत्र्याचा (Car roof) भाग कापावा लागला. हा पत्रा कापल्यानंतर जीवन रक्षक पथकाने कारमध्ये उतरुन मृतांना आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना खामगाव (Khamgaon News) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

कौटुंबिक कार्यक्रम आटोपून परतताना भीषण अपघात, दोन वाहनांची जोरदार धडक, 13 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

बीडजवळ भीषण अपघात, कारची लक्झरी बसला धडक; 15 वर्षीय मुलासह वडील ठार

पुण्यात कात्रज-नवले पूल रस्त्यावर भीषण अपघात, एका महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी

source https://marathi.abplive.com/news/buldhana/car-and-truck-accident-in-3-passangers-died-on-the-spot-buldhana-accident-news-in-marathi-1358839

Post a Comment

0 Comments