Nagpur Crime News : शासकीय योजनेसाठी मुलींच्या अर्धनग्न फोटोंची मागणी, नागपुरातील शाळेकडून पालकांना आलेल्या WhatsApp मेसेजनं खळबळ

Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शाळेत शैक्षणिक कामाची बतावणी करून अल्पवयीन विद्यार्थिनींचे अर्धनग्न फोटो व्हाट्सएपवर (WhatsApp) मागवण्याच्या धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पालकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुराच्या (Nagpur Crime) महाल परिसरातील एका शाळेतील सहावी ते आठवी या वर्गातील मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर मॅसेज आले. यात शाळेतील शिक्षिका असल्याची आरोपीने बतावणी केली आणि शैक्षणिक कामासाठी सुरवातीला मुलींचे पासपोर्ट फोटो पाठण्याचा संदेश मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर दिला.

शासकीय योजनेसाठी मुलींचे अर्धनग्न फोटोंची मागणी

दरम्यान, काही पालकांनी खरंच शाळेतील शिक्षिकेचा नंबर आहे का? याची कुठलीही खातरजमा न करता अनोळखी व्हाट्सएप क्रमांकावर मुलींचे पासपोर्ट फोटो पाठवले. मात्र, थोड्या वेळानंतर एका शासकीय योजनेसाठी मुलींचे अर्धनग्न फोटोंची मागणी त्या अज्ञात आरोपीने व्हाट्सअप मेसेज द्वारे पालकांकडे केली. त्यानंतर मात्र पालकांना शंका आली, शाळेतील शिक्षकांकडे यासंबंधी माहिती घेतल्यावर शाळेने कोणतेही फोटो मागितले नसल्याचे समोर आले आणि कोणीतरी हा गैरप्रकार केल्याचे समोर आले.

15 ते 16 मुलींच्या पालकांसोबत हा गैरप्रकार, गुन्हा दाखल

पुढे आलेल्या माहितीनुसार, शाळेतील 15 ते 16 मुलींच्या पालकांसोबत हा गैरप्रकार झाला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात सायबर कायद्यासह इतर कालामंतार्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या प्रकरणाने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

टाटा मॅजिकला ट्रकनं दिली जोरदर धडक; तिघांचा जागीच मृत्यू

प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी टाटा मॅजिकला ट्रकनं जोरदर धडक दिली आहे. या अपघातात टाटा मॅजिकच्या ड्रायव्हर सह 3 जणांचा मृत्यू, तर 14 प्रवासी जखमी झाले असून मुल तालुक्यातल्या चितेगाव येथील ही घटना आहे. सिंदेवाहीवरुन प्रवाशी घेऊन मुलकडे हे प्रवासी वाहन निघाले होतं. प्रवासादरम्यान चितेगावजवळ विरूद्ध दिशेने येणाऱ्या शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरा-समोर धडक दिली.  या अपघातात निर्दोष मोहूर्ले (ड्रायव्हर), मनाबाई सिडाम (65) आणि एक प्रवाशी या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणातील ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून मुल पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/T360IvG Caste Marriage : आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची सुरक्षा पोलिस कमिशनर, SP करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

source https://marathi.abplive.com/crime/whatsapp-message-from-nagpur-school-demand-offensive-photos-of-girls-on-the-name-of-government-scheme-to-parents-nagpur-crime-police-filed-a-case-1359003

Post a Comment

0 Comments