Nagpur News : एलओसीवरुन (LOC) बेपत्ता झालेल्या नागपूरच्या महिलेचा शोध लागला आहे. महिलेला पाकीस्तान प्रशासनाकडून भारतीय बीएसएफला सोपवलं गेलं आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) या महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुनीता जमगडे (Sunita Jamgade) असं या महिलेचं नाव आहे. दरम्यान, सुनीताला नागपूरला आणल्यानंतर नागपूर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा औपचारिकरित्या अटक केली होती. त्यानंतर तिला रात्री विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं असता सुनीता जमगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमृतसरमध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे जमगडेला अटक करण्यात आलीय. आता एफआयआर कपिलनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती नागपुरातील झोन पाचचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकी काय नवी माहिती हाती येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तपासाकडे लक्ष

पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांच्या चार सदस्यांच्या पथकाने जमगडेला अमृतसर पोलिसांकडून ताब्यात घेतले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मंगळवारी रात्री पोलिसांच्या एका पथकाने तीला अमृतसरहून दिल्लीला ट्रेनने नेले आणि बुधवारी रात्री उशिरा नागपूरला पोहचवलं. त्यापूर्वी शनिवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुनीता जमगडेला अटारी-वाघा सीमेवरून हद्दपार केलं. त्यानंतर पंजाबमधील अमृतसर पोलिसांनी जमगडे विरुद्ध एफआयआर नोंदवला. अशातच आता सुनीता जमगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या दरम्यान, पोलीस अधिकारी तिला पाकिस्तानात राहणाऱ्या आणि तिच्याशी संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींच्या संबंधांबद्दल विचारपूस करू इच्छितात, ज्यांच्याशी ती अनेक महिन्यांपासून संपर्कात होती. या विषयी अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना विशेषतः हे जाणून घ्यायचे आहे की जमगडे हीने झुल्फिकार आणि पास्टरसह पाकिस्तानी नागरिकांशी कोणत्या प्रकारची माहिती शेअर केली.

पाकीस्तानच्या प्रशासनानं भारतीय BSFला सोपवलं

दरम्यान, कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरातील संत कबीरनगर येथील रहिवासी असलेल्या जमगडे या 4 मे रोजी तिच्या 13 वर्षांच्या मुलासह नागपूरहून कारगिलला पोहोचली. तेथून ती 14 मे रोजी पाकिस्तानला गेली. नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडण्यापूर्वी तिने तिच्या मुलाला मागे सोडल्याचे वृत्त आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, सीमा ओलांडताना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी महिलेला पकडले आणि शनिवारी वाघा सीमेवर तिला अधिकृतपणे भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन होईपर्यंत तिला ताब्यात ठेवण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/De3Cx28 Hagwane Case : हगवणे बंधुंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ; पिस्तूल परवान्यासाठी चक्क पोलिसांची फसवणूक, गुन्हा दाखल

source https://marathi.abplive.com/news/nagpur-missing-woman-sunita-jamgade-who-went-to-pakistan-returns-india-remanded-in-police-custody-till-june-2-know-more-what-is-the-real-issue-1361582
0 Comments