Pune Accident पुणे: पुण्यात भावे हायस्कूलजवळ काल (31 मे) सायंकाळी भीषण अपघात (Pune Car Accident) झाला. भर धाव कारनं टपरीवर चहा पिणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना उडवलं. हे 12 विद्यार्थी एमपीएससीचे (MPSC Exam) असल्याची माहिती आहे. जखमीपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

जखमी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची आज (1 जून) परीक्षा आहे. अपघातात चारजणांचे पाय मोडले तर एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्रशान करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळाली आहे.

वाहन चालकाला आज न्यायालयात हजर करणार-

पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका भरधाव वेगात आलेल्या कारने 12 जणांना उडवलं होतं. या प्रकरणी या गाडीचा चालक जयराम मुळे दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय तपासणी नंतर स्पष्ट झालं आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ), १२५(ब), २८१ अन्वये आणि मोटार वेहिकल ऍक्ट अंतर्गत कलम दाखल केले असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल झालेल्या अपघातात 9 जण जखमी झाले होते तर यातील 2 जणं हे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी होते.

सदर अपघाताचा सीसीटीव्ही समोर-

सदर अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलनाझ सिराज अहमद जखमी झाले.

नेमकं काय घडलं?

पेरूगेट येथील श्री नाथसाई अमृततुल्य हॉटेलबाहेर अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास चहा पीत उभे होते. त्यावेळी जंगम महाराज मठाकडून भरधाव वेगाने खासगी प्रवासी टॅक्सी वेगाने आली व ती डाव्या बाजूला अखिल सदाशिव पेठ नवरात्र मंडळाकडे वळली. मात्र, तेथे मुळात अरुंद असलेला निम्मा रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापला होता. तेथे कारचालकाचे नियंत्रण सुटले व ब्रेक दाबण्याऐवजी त्याने अॅक्सिलरेटरवर पाय दिला.

एकनाथ शिंदेंनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद-

सदर अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? यावर चर्चा केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक आमदार हेमंत रासणे उपस्थित राहिले. हेमंत रासणे यांनी मुख्यमंत्र्यांना या घटनेची माहिती दिली. या सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यांचा जो काही खर्च असेल तो शासन करणार आहे.

12 विद्यार्थ्यांना भरधाव कारनं उडवलं, VIDEO:

संबंधित बातमी:

<a href="https://ift.tt/keD9t6U car Accident : एकनाथ शिंदेनी साधला जखमी विद्यार्थ्यांशी संवाद, सर्वोतपरी मदत करण्याचं आश्वासन

source https://marathi.abplive.com/news/pune/pune-accident-12-mpsc-student-injured-4-peoples-legs-broken-in-pune-car-accident-1361918
0 Comments