NIA Raid : मोठी बातमी! पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणी NIA कडून 5 राज्यात 15 ठिकाणी छापेमारी; PIOशी संबधित संशयित लोकांच्या मालमत्तांवर छापे

NIA Raid : पाकिस्तानी हेरगिरी प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) कडून 5 राज्यात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. PIOशी  संबधित संशयित लोकांच्या मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई,  हरियाणा, उत्तर प्रदेश राजस्थान छत्तीसगड आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. NIA ने या  छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात इलेट्राॅनिक साहित्य, संवेदनशीन आर्थिक व्यवहार असलेली कागदपत्र आणि आक्षेपार्ह साहित्य  जप्त केली आहेत.

दरम्यान, भारतविरोधी दहशतवादी कटाचा भाग म्हणून पाकिस्तानस्थित व्यक्तीकडून चालवल्या जाणाऱ्या हेरगिरी रॅकेटच्या सुगावांसाठी त्यांची सखोल तपासणी केली जात आहे. तर छाप्यांमध्ये लक्ष्य केलेल्या संशयितांचे पाकिस्तानी कार्यकर्त्यांशी संबंध होते आणि ते भारतात हेरगिरी कारवाया करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून काम करत होते. 2023 पासून पीआयओंसोबत संवेदनशील माहिती शेअर करणाऱ्या आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती लीक करण्याच्या बदल्यात भारतातील विविध मार्गांद्वारे निधी मिळवणाऱ्या एका आरोपीला अटक केल्यानंतर एनआयएने 20 मे रोजी हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी NIA अधिक तपास करत आहे.

दहशतवादविरोधी NIA या प्रकरणात तपास सुरू ठेवत आहे, जो बीएनएस 2023 च्या कलम 61(2), 147,148  अधिकृत गुपिते कायदा 1923 च्या कलम 3  आणि 5 आणि यूए(पी) कायदा 1967 च्या कलम 18 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. अशी देखील माहिती NIA कडून देण्यात आली आहे.

ज्योती मल्होत्राच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर

अलीकडेच ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरलाही गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता सीआरपीएफ जवानाला एनआयएकडून अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानला भारतासंबंधी संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती पाठवण्यासाठी त्याला पैसे दिले जात होते. तो हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता, अशी माहिती समोर येत आहे. मोती राम जाट,  सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशातून अनेक गुप्तहेर पकडले गेले आहेत.

दुसरीकडे, हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हिसारच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राविषयी एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्योतीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीवरून असे स्पष्ट झाले आहे की, ती पाकिस्तानातील प्रसिद्ध युट्यूबर झिशान हुसैनशी नियमित संपर्कात होती. झिशानसोबत मिळून ती पाकिस्तानची प्रतिमा सकारात्मक दाखवण्यासाठी प्रयत्न करत होती. झिशानव्यतिरिक्त, ती पाकिस्तानातील इतर काही युट्यूबर्सच्या संपर्कातही होती. दोन महिन्यांपूर्वी ज्योती धार्मिक व्हिसावर पाकिस्तानला गेली होती, त्यावेळी तिने झिशानला मेसेज केला होता, अशी माहितीही आता पुढे आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/eag39MG कडून कोणता देश घेतो सर्वाधिक कर्ज? भारत किती घेतो कर्ज? पाकिस्तानचा कितवा  नंबर? जाणून घ्या सविस्तर माहिती

source https://marathi.abplive.com/news/nia-raids-15-places-in-5-states-in-pakistani-espionage-case-raids-on-properties-of-suspected-people-related-to-pio-india-pakistan-tensions-operation-sindoor-1361911

Post a Comment

0 Comments