<p><strong>Maharashtra Breaking LIVE Updates: </strong>पुणे शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी संध्याकाळी पुण्यातील भावे हायस्कूलजवळ ही घटना घडली. तसेच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विविध माहिती समोर येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बातम्यांसह देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-updates-today-1st-june-2025-monsoon-updates-mumbai-rains-nilesh-chavan-vaishnavi-hagawane-case-pune-accident-maharashtra-politics-updates-1361912
0 Comments