Maharashtra Live Blog: माळेगाव सहकार साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल, शरद पवार-अजितदादांची प्रतिष्ठा पणाला

<p>Maharashtra Live Blog updates: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नीलकंठेश्वर पॅनल उभा करण्यात आले. उपमुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सहकार महर्षी व भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार बचाव पॅनल तर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढले जाणार बळीराजा सहकार बचाव पॅनल आणि कष्टकरी शेतकरी पॅनल असे एकूण चार पॅनल 21 जागांसाठी निवडणुकीच्या मैदानात आहेत. 21 जागांसाठी तब्बल 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात रिंगणात आहेत. सकाळी 9 पासून मतमोजणीला सुरुवात होईल 34 टेबल वरती दोन राउंड मध्ये ही मतमोजणी होणार आहे एकूण 88.48% मतदान झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. (Malegaon sahakari sakhar karkhana election 2025)</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-beed-santosh-deshmukh-case-maharashtra-politics-malegaon-sahakari-sakhar-karkhana-election-2025-1365817

Post a Comment

0 Comments