Amar Kale: बारा वर्षे रखडलेल्या पुलाचे उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार राज्यकर्त्यांना नाही; खासदार अमर काळे यांनी ओढले सरकारवर ताशेरे

Amar Kale वर्धा : वर्ध्यात (Wardha) मुख्य रेल्वे लाईनवर उभारला गेलेला उड्डाण पुल तब्बल बारा वर्षे रखडला. निवडणूक काळात हा उड्डाण पूल निवडणुकीत मुद्दा देखील ठरला. पण इतक्या दीर्घ काळ रखडलेल्या उड्डाण पुलाचे उद्घाटन आता कुठल्याही राजकीय व्यक्तीने करू नये, उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकारच कुठल्याही राजकीय माणसाला नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमर काळे (Amar Kale) यांनी केली आहे. आपण स्वतः या इतके वर्षे रखडलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनासाठी येणार नसल्याचा निश्चय ही खासदार काळे यांनी बोलून दाखविला आहे.

रिक्षावल्याच्या हाताने या पुलाचे उदघाटन करा- अमर काळे

वर्ध्याच्या बजाज चौकात असलेला यवतमाळ, हिंगणघाट आणि राळेगाव या शहरांना वर्ध्याशी जोडणारा उड्डाण पुल अनेक वर्षे रखडला होता. यादरम्यान सततच्या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. आता या पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आठ दिवसात काम पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत हा पूल सादर होऊ शकतो. या पुलाची पाहणी आज खासदार अमर काळे यांनी केली. या भेटी वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान लवकरात लवकर पूल सुरू करावा, नेत्यांच्या तारखा मिळत नाही म्हणून उदघाटन लांबणीवर पडू नये, एखाद्या रिक्षावल्याच्या हाताने या पुलाचे उदघाटन करावे, असाही सल्ला ही खासदार अमर काळे यांनी दिला आहे.

तब्बल 9 वर्षानंतर होतेय भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक

मागील 9 वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला. भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी निवडणूक म्हणून बँकेच्या निवडणुकीकडं बघितल्या जातं. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 21 संचालक निवडून देण्यासाठी1056 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी आजपासून 27 जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 27 जुलैला मतदान होणार असून 28 जुलैला मतमोजणी होणार आहे. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीकडं आता भंडारा जिल्ह्याततील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची धावपळ बघायला मिळणार आहेत. अशातच या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे देखील आता महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा

<a href="https://ift.tt/JQRwXuS Crime: गाडीचा हॉर्न का वाजवला? जाब विचारताच जोरदार भांडण अन् दगडफेक, माजी नगरसेवकाचा मुलगा जखमी

source https://marathi.abplive.com/news/sharad-pawar-ncp-mp-amar-kale-lashed-out-at-the-government-over-inauguration-of-flyover-delayed-for-twelve-years-in-wardha-maharashtra-politics-marathi-news-1365621

Post a Comment

0 Comments