Maharashtra Live: माळेगाव सहकारी कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. मतदान करण्यासाठी शरद पवार येणार नसल्याची प्राथमिक माहिती. शरद पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. पुण्यात त्यांचे दोन कार्यक्रम असल्यामुळे शरद पवार मतदानाला येणार नसल्याची माहिती. सकाळी 11 वाजता एक आणि संध्याकाळी पाच वाजता एक असे शरद पवारांचे दोन कार्यक्रम. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. खासदार सुप्रिया सुळे मात्र सकाळी सात वाजता आपला मतदानाचा हक्क बजावतील

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-breaking-news-iran-israel-war-america-attack-on-iran-malegaon-sahakari-karkhana-weather-rain-news-1365449

Post a Comment

0 Comments