परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. बाधित 31 गावांतील प्रत्येकी दोन शेतकरी या बैठकीला येणार आहेत. 1 जुलैपासून महामार्गाची प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार असून, त्याला विरोध करण्याची रणनीती ठरवली जाणार आहे. महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील 1500 ते 1525 एकर जमीन जाणार आहे. एकूण 3839 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून, 1500 ते 2000 शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवले आहेत.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-farmers-to-hold-crucial-meeting-against-shakti-peeth-highway-in-parbhani-maharashtra-land-measurement-to-begin-from-july-1-1366641
0 Comments