<p><strong>Maharashtra Breaking Updates: हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा निघणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना फोन केला होता. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मत राज ठाकरेंनी मांडलं. यानतर उद्धव ठाकरेंनेही एकत्र मोर्चा काढण्याची तयारी दर्शवली. यासह मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात कालच्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-updates-28-june-2025-raj-thackeray-uddhav-thackeray-mumbai-marathi-morcha-shivsena-mns-yuti-maharashtra-weather-update-mumbai-pune-rains-1366637
0 Comments