विदर्भात पावसानं काल धुमाकूळ घातला. वाशिम, अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला. हवामान खात्याने अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पुढील तीन-चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-rain-havoc-in-maharashtra-3-deaths-in-vidarbha-yellow-alert-for-akola-washim-buldhana-floods-disrupt-normal-life-1366449
0 Comments