Maharashtra Breaking Updates: मराठीसाठी 5 जुलैला विराट मोर्चा; ठाकरे बंधू एकत्र येणार?

<p><strong>Maharashtra Breaking Updates: हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. मनसेचा 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आहे. तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय मराठीचा अजेंडा घेऊन मोर्चात सहभागी व्हा, असं आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटासोबत देखील आम्ही बोलू, असं राज ठाकरेंनी सांगितले. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, ठाकरे बंधू एकत्र येण्याची हीच ती वेळ, अशी चर्चा सध्या महाराष्ट्रभर रंगली आहे. यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच पंढरपुर वारीचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. राज्यातील या घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...</strong></p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-updates-morcha-for-marathi-on-july-5-raj-thackeray-and-uddhav-thackeray-will-come-together-devendra-fadnavis-hindi-compulsory-in-maharashtra-politics-maharashtra-rains-akola-washim-mumbai-pune-rains-1366442

Post a Comment

0 Comments