तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेत त्रिभाषा सूत्रीवरती सरकारची भूमिका मांडणार आहेत. त्रिभाषा सूत्र राबवताना विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा शिकविण्याची गरजच काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-education-minister-to-meet-mns-chief-raj-thackeray-over-hindi-language-row-and-three-language-formula-controversy-1366242
0 Comments