Bhandara: काँग्रेस आणि शिंदे सेनेची आघाडी महिनाभरातच फिस्कटली; भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर, तर विरोधात महायुतीचा उमेदवार

भंडारा : दूध संघाच्या निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडाऱ्यात काँग्रेससोबत आघाडी केली होती. मात्र, महिनाभरातचं काँग्रेसनं शिंदे शिवसेनेला दूर ठेवून भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक (Bhandara District Bank Election) स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतलाय. दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानं भंडाऱ्यातील शिंदेची शिवसेना बॅक फुटवर आल्यानं बँकेच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा महायुतीत आश्रय घेतलाय. जिल्हा बँकेवर 21 संचालकांची निवड होणार आहे. 27 जुलैला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी उचल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नाना पटोले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कुठल्याही परिस्थितीत बँकेवर सत्ता मिळवायचं हा उद्देश नाना पटोले यांनी ठेवलाय. तर नाना पटोलेंच्या पॅनलला चारीमुंड्या चित करण्यासाठी आता अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे शिवसेनेची महायुती भक्कमपणे उभी आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील फुंडे यांच्या विरोधात काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी कायम ठेवली असून ही सर्वात लक्षवेधी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता काँग्रेस एकला चलो रे चा नारा देत आहे. तर, महायुती त्यांच्यापुढे उभी आहे. दोन्ही बाजूंनी बँकेवर सत्ता मिळविण्याचा दावा केलाय. असं असलं तरी, निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनचं आता दोन्ही बाजूनं एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय.

जिल्हा बँकेत काँग्रेसचीच सत्ता येणार- नाना पटोले

दूध संघाच्या निवडणुकीत शिंदे सेनेला एक जागा दिली होती. मात्र, ते आपल्याचं याच्यात राहिलेत. बँकेचे विद्यमान संचालक मंडळकडून शेतकरी विरोधी धोरण चालविल्या जात होतं. महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसती तर भंडारा जिल्हा बँक अवसायानात गेली असती. शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण घेणारी ही बँक आहे. आम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत काँग्रेसची सत्ता येणार, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांना डिव्हीडंट वाटपाचं काम मी केलं- सुनील फुंडे

2005 ते 2025 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची या बँकेवर सत्ता राहिली. मात्र, माझ्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. या बँकेच्या व्यवहारात पारदर्शीपणा आणण्याचं काम केलं. सतराशे कोटींच्या ठेवी आणल्यात. चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्रातील 14 बँकेमध्ये भंडाऱ्याच्या बँकेचे ही नाव आणलं. आतापर्यंत कुणीही या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिव्हीडंट वाटपाचं काम केलं नाही ते मी केलं. बँकेच्या निवडणुकीदरम्यान कोणत्याही पॅनलवर बँकेबाबत अपप्रचार करू नये. ही शेतकऱ्याची बँक असल्यानं अपप्रचार केल्यास खातेदारांवर त्याचा परिणाम पडतो. असे मत भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले, मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी उलगडली

source https://marathi.abplive.com/news/bhandara-district-bank-elections-congress-and-eknath-shinde-shivsena-alliance-fizzled-out-within-a-month-congress-on-its-own-also-mahayuti-candidate-in-opposition-maharashtra-politics-marathi-news-1370259

Post a Comment

0 Comments