Kalyan Hospital Receptionist Case: कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये एका दवाखान्यात तरुणीला बेदम मारहाण (Kalyan Hospital Receptionist Case) केल्याची घटना घडली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रिसेप्शनिस्ट तरुणी गोकुळ झा याच्या वहिनीला मारत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला त्यामुळे या घटनेला वेगळं प्राप्त झाल्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगली.

सदर झालेल्या प्रकरणाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती लागला आहे. आरोपी गोकुळ झा या सीसीटीव्हीमध्ये त्याच्या नातेवाईकांसोबत दवाखान्यात प्रवेश करताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे तो डॉक्टरांना भेटण्याची देखील घाई करत असल्याचे त्याच्या हालचालीवरून दिसून येत आहे. रिसेप्शनिस्ट हिच्याशी वाद घालून डॉक्टरला भेटण्याचा आग्रह करत आहे. त्याच्या हालचाली स्पष्ट सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहेत डॉक्टरला भेटण्यासाठी एमआर आले असल्याचे रिसेप्शनिस्टने गोकुळ झा याला सांगितले. मात्र डॉक्टरला भेटण्यासाठी गोकुळ झाची घालमेल सुरू होती. तो दवाखान्यात आत बाहेर चकरा मारत असताना डॉक्टरला भेटण्यासाठी आलेले तीन एमआर बाहेर जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहेत.

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?

गोकुळची आई त्याची वहिनी डॉक्टरच्या केबिनकडे गेल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरच्या केबिनच्यासमोर असलेल्या रेसिपशनिस्ट सोबत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. गोकुळ याने डॉक्टरला शिवीगाळ केली. त्यावेळी रिसेप्शनिस्ट म्हणाली मला शिव्या देतोस ठीक आहे. मात्र डॉक्टरांना तू का देतोस? असा वाद सुरू होऊन रिसेप्शनिस्टला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोकुळची वहिनी त्याला अडवत दवाखान्या बाहेर घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा गोकुळ झा रिसेप्शनिस्टकडे धावून येत रिसेप्शनिस्टला पायाने मारत असताना त्याच्या आईने गोकुळला दवाखान्या बाहेर घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीद्वारे समोर आले आहे. या घटनेदरम्यान दुसरा सीसीटीव्ही समोर आला. त्यामध्ये रिसेप्शनिस्ट गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात मारत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला. त्यामुळे या घटनेला वेगळं वळण प्राप्त झाल्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. रिसेप्शनिस्टनेच अगोदर मारहाण केल्याचा दावा केला आहे.

तू एक महिला आहेस, त्याला अडवू शकत नाही का?

सदर संपूर्ण सीसीटीव्ही वरून लक्षात येत आहे की गोकुळ झा यानेच रिसेप्शनिस्टला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे या सीसीटीव्हीमधून सिद्ध होत आहे. गोकुळची आई त्याला दवाखान्या बाहेर घेऊन जातात संतापलेल्या रिसेप्शनिस्ट खुर्चीमधून उठून बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी टेबलावर असलेले कागदपत्र देखील पडताना दिसून येत आहेत. गोकुळच्या वहिनीकडे ही रिसेप्शनिस्ट गेली आणि तिला तिने सांगितले तू एक महिला आहेस, तू पहात आहेस त्याला अडवू शकत नाहीस का? तो काहीही बोलत आहे, असे बोलता बोलता तिने गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लगावली. त्यानंतर दवाखान्याबाहेर उभे असलेला रंजीत झा त्याचा भाऊ गोकुळ झा रिसेप्शनिस्टच्या दिशेने धावून येऊन गोकुळणे रिसेप्शनिस्टला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या संपूर्ण सीसीटीव्हीच्या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येत आहे रिसेप्शनिस्ट अगोदर गोकुळच्या वहिनीच्या कानशिलात लावल्याचा सीसीटीव्ही हा घटनेनंतरचा आहे. या सीसीटीव्हीवरून रिसेप्शनिस्टच अगोदर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र या संपूर्ण सीसीटीव्हीवरून लक्षात येत आहे की, गोकुळ झा यानेच रिसेप्शनिस्टला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे या सीसीटीव्हीमधून सिद्ध होत आहे.

रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, VIDEO:

संबंधित बातमी:

<a href="https://ift.tt/pqgJ3nm Hospital Receptionist Case: गोकुळ झाने मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारलं; आता डॉक्टरांची धक्कादायक माहिती, म्हणाले, पॅरालिसीस...

source https://marathi.abplive.com/crime/kalyan-hospital-receptionist-case-gokul-jha-was-the-first-to-beat-up-the-receptionist-girl-1372047
0 Comments