Maharashtra Breaking LIVE News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक
Baba Siddiqui Death Case : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी (Baba Siddiqui Death Case) महत्वाची अरडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.  या प्रकरणातील हा 28 वा अटक आरोपी आहे. अमोल गायकवाडचा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकितही अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
अहिल्यानगर : जिल्ह्यातील संगमनेर (Ahilyanagar) तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-live-news-updates-manoj-jarange-maratha-reservation-rally-uddhav-thackeray-raj-thackeray-bjp-devendra-fadvis-eknath-shinde-mumbai-rains-state-monsoon-updates-1380503
Post a Comment
0 Comments