Maharashtra Live blog updates: मुंबईत खासगी टॅक्सीचालकांनी परदेशी नागरिकांना लुटलं, पोलिसांकडून तपास सुरु

<p>Maharashtra Live blog Updates: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार चालकांकडून परदेशी नागरिकांना धमकावून त्यांना लुबाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील फसवणूक करण्यात आलेली एक व्यक्ती अमेरिकन नागरिक असून दुसरा व्यक्ती ऑस्ट्रेलियाचा राहणारा आहे. पहिल्या तक्रारीत अमेरिकन नागरिक फ्रॅक कॉफमन यांनी विमानतळाहून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी उबेर अॅपद्वारे कार बुक केली असता. &nbsp;चालक आरोपी अरूण मिश्रा यांनी फ्रॅक कॉफमन यांना रस्त्यात थांबवून त्यांच्याकडील महागडा मोबाईल आणि पैशांची मागणी केली.&nbsp;</p> <p>तर दुसऱ्या घटनेत ईयान विल्यम अॅस्टन या ऑस्ट्रेलियन नागरिकाने &nbsp;विमानतळ ते पंचतारांकित हॉटेल ३५०० रुपये ठरले असताना आरोपी चालक सुनिल शर्मा याने त्याच्याकडून ३५०० रुपयांची मागणी केली. या दोन्ही घटनेत परदेशी नागरिकांना लुबाडणाऱ्या चालकांविरोधात पंचताराकित हॉटेलच्या कर्मचार्याने दिलेल्या तक्रारीनंतर सहार पोलिस ठाण्यात खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहार पोलिस करत आहेत.</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-live-blog-updates-todays-breaking-news-13-august-2025-dadar-kabutar-khana-election-commission-mns-rain-weather-news-1376774

Post a Comment

0 Comments