Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने (IMD forecast) विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहील. तर मराठवाड्यात 14 व 15 ऑगस्टला पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. तर तिकडे विदर्भात अमरावती , चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूर वेधशाळेने दिला आहे. शिवाय उर्वरित जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे.

मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार

दुसरीकडे, मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, मध्य मुंबई तसेच दक्षिण मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सारी कोसळत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार तास मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

सोलापुरात मागील तासाभरापासून मुसळधार

तिकडे सोलापुरात मागील तासाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून सोलापुरात शहरात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र रात्री 12 नंतर पुन्हा एकदा सोलापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. मागील 4-5 दिवसापासून अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. दिवसभर ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याचे सोलापूर शहरात पाहायला मिळतंय.

कोणत्या जिल्ह्याला कुठले अलर्ट?

14 ऑगस्ट : वाशिम, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ,गडचिरोली ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड ,बीड,अहिल्यानगर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणपट्टी

15 ऑगस्ट : रत्नागिरी व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ ,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली जिल्हाही पावसाचा ऑरेंज अलर्ट
यलो अलर्ट : रायगड ,मुंबई, ठाणे,पुणे कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड व नागपूर

16 ऑगस्ट : रायगड रत्नागिरी तसेच पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा, अकोला, अमरावती आपल्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
यलो अलर्ट : मुंबई, पालघर ,ठाणे, नाशिक व नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.

ही बातमी वाचा:

Navi Mumbai : धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठा दिलासा, रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लागणार; पर्यावरण विभागाकडून NOC घेण्यास कोर्टाची परवानगी

source https://marathi.abplive.com/news/maharashtra-weather-update-high-alert-in-several-districts-along-with-mumbai-imd-issues-alarts-heavy-rain-marathwada-vidarbha-weather-forecast-marathi-news-1376995
0 Comments