<p><strong>Maratha Reservation Manoj Jarange:</strong> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. त्यात आज आंदोलकांची आझाद मैदानात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.अश्यात अजून ही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आज काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.</p>
source https://marathi.abplive.com/news/mumbai/manoj-jarange-patil-azad-maidan-agitation-third-day-live-updates-maratha-reservation-in-mumbai-1380884
0 Comments