मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, हवामान खात्याने रेड अलर्ट जारी. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक २०-२५ मिनिटे उशिराने, रस्त्यांवर वाहतूक खोळंबली. विक्रोळीतील पार्क साईड भागात दरड कोसळून दोघांचा मृत्यू, जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू. डोंबिवली पश्चिममधील ४५ वर्षे जुनी इमारत खचल्याने रहिवाशांनी ती तातडीने खाली केली, मोठा अनर्थ टळला. उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला, चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक पाण्याखाली गेला. चिपळूण-गुहागर मार्गावर रामपूर इथे घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती, स्थानिकांनी ती बाजूला केली. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील गड नदीला पूर आल्याने पाणी बाजारपेठेत शिरले, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले, प्रशासनाने मासेमारी करणाऱ्यांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात आज येलो तर पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी. वाशिम जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे धरण प्रकल्प प्रभावित.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-rains-heavy-downpour-causes-waterlogging-landslide-kills-two-in-vikhroli-alerts-issued-across-maharashtra-konkan-floods-1377521
0 Comments